शून्य...
शून्य चिखलात पाय रुतावा आणि जितका तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा तितका तो खोल जावा...असं काहीसं आयुष्य झालयं. अभिमन्युसारखं चक्रव्यूह भेदन्याचं कौशल्य यावं मात्र त्यातून बाहेर पडणं न जमावं...काहीसं असचं..! फक्त इथे कौरव नाहीत आणि अभिमन्युच्या मृत्युचा सुड घेणारा अर्जुनासारखा बाप सुद्धा... प्रत्येकवेळी घेतलेला निर्णय चुकावा आणि त्याबरोबर आयुष्यच चुकत जावं..असं काहीसं घडतयं..कारण इथे आयुष्यरथाचा सारथी बनून वाट दाखवणारा कृष्ण नाहीये...खंत कृष्ण नसल्याची नाहीये तर कृष्ण बनून रस्ता चुकवणाऱ्या त्या खोट्या माणसांवर विश्वास ठेवण्याची आहे. जी तुम्हाला पावलोपावली सापडतात..कृष्णाचं सोंग घेवून! वरकरणी सोप्प आणि सहज वाटणारं जगणं ज्यावेळी क्लिष्ट होवून बसतं त्यावेळी आपल्या ...