पत्र...
" पत्र. ..." पेनाने नाही तर आसवांनी लिहलेलं... एक पत्र आहे तुझं, मी जपूण ठेवलेलं... धूळ होती थोडी, आणि मळकटलेला कागद... हाताने पूसून त्याला उचललं मी अलगद... वाचलंय मी ते कितीदातरी, पण पुन्हा वाचावसं वाटलं... आठवणींच्या त्या गावात पुन्हा धुकं दाटलं... त्यात शब्द होते मोजकेच;पण भावना मात्र ठासून भरलेल्या... एवढ्याशा त्या तुकड्यात, साऱ्या आठवणी दडलेल्या... प्रत्येक वेळी वाटतं, फाडून टाकावं याला... जळजळत्या त्या अग्निकुंडात, जाळून टाकावं याला... बुध्दी "हो" म्हणते याला, पण मन मात्र "नाही" म्हणते... ...