Posts

Showing posts from February, 2017

निर्णय

                                                                                                 निर्णय                           आज तिच्या आधी घरी पोहचायचं होतं...आणि पोहचलोही. ती यायच्या आत घर आवरायचं होतं, याआधी कधी मी हे काम केलंच नाही. मुळात तिने कधी करू दिलच नाही...सुरूवातीला सोप्प वाटणारं काम जेव्हा करायला घेतल्यानंतर अशक्यप्राय वाटू लागतं, तेव्हा स्वत:च्या क्षमतेवर अविश्वास ठेवण्याशिवाय पर्याय उरत नाही. तरीही पाठ थोपाटण्या सारखं नसलं तरी क्षमतेपेक्षा चांगलं काम करण्याचा आनंद झाला..एवढचं! काम आटपून टिव्ही पाहायला बसणार, तेवढयात सौभाग्यवतींची एन्ट्री झाली..रोज कुलूप उघडायची सवय असणाऱ्या आमच्या तिला आज बेल वाजवताना चुकल्यासारखं नक्कीच वाटलं असणार..याचा अंदाज बांधूनच दरवाज...

बालपण...

"बालपण"                           काल मी माझ्या लहानपणीचे फोटो न्याहळत होतो. खूप वेळ एकच फोटो पाहत होतो...बटन तुटलेला शर्ट, अस्ताव्यस्त केस, अनवानी पाय तरीही ऐटीत उभा राहीलेला एक गोंडस मुलगा...खूप हेवा वाटला मला माझ्याच बालपणाचा.                          असं का वाटलं असावं मला? आणि पुन्हा पुन्हा तेच फोटो पाहणं...! यावर थोडा विचार केला. आणि मग लक्षात आलं कि, मी त्या फोटोत काय शोधत होतो..?आणि का मला ती गोष्ट हवीहवीशी वाटतेय..? मी त्या फोटोत माझं निश्चिंत आणि निरागस बालपण शोधत होतो. कसलीही काळजी न करता बागडणारा 'मी' शोधत होतो. हसू आल्यावर हसणारा आणि रडू आल्यावर जोराने रडणारा एक मुलगा शोधत होतो. दिवसभर बेधुंद फिरणारा आणि रात्री आईच्या कुशीत झोपणारा एक हळवा बालक शोधत होतो.                       आणि तो मला कुठेतरी आठवणींच्या ठेवीत सापडलाही...आणि त्यासोबत सापडलं.."माझं बालपण..." पण खंत एवढीच की ते मला ...

जिवन

                                                                      जिवन            जिवन या शब्दाचे अनेक अर्थ आपल्यापरीने लोकांनी लावण्याचा प्रयत्न केला.. मी हि केला. पण मला कळलेलं जिवन हे बालिशपणाचा विचार किंवा सर्वात मोठा अन्वयार्थ देऊन जाणारा कवडसा असू शकतो.           माझ्यामते जिवनाचं वास्तव हे आपल्या कल्पनेप्रमाणे कधीच नसतं. कारण वास्तव आणि कल्पना किंवा आपले विचार हे वास्तव होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याबद्दल बाळगलेल्या अपेक्षा ह्या जशाच तश्या कधीच पूर्णत्वास जात नाहीत. आणि हे सत्य जर असेल तर हा विचार किंवा मला कळालेलं जिवन हे नक्कीच बालिशपणा नसेल.            मला ह्या पेचात पडायचं देखील नाही पण हे वास्तव आहे हे कळाल्यानंतर विचारचक्र दुप्पट वेगाने घुमू लागले. पण मग प्रश्न हा उपस्थित होतो कि कल्पना ह्या आकारणीय अ...