Posts

Showing posts from 2017

इन्तेजार

                        इन्तेजार... "आज थोड़ीसी आस लगाये बैठी होगी... सुबह की चाय आज उसने मेरीे यादो के संग देर तलक उबाली होगी... जैसे चाय के साथ हर लम्हा पका लेना चाहती हो... बेचैनियां जरूर होंगी..पर उससे ज्यादा उसकी खुशी झलकेगी उसके बने हुवे खाने से आज.. जो शायद मन कि रसोई में वो कबसे मेरे लिएे ही पका रही थी... दहलीज से बाहर झांकती उसकी आंखें आज हर आहट को पहचानती होगी... नही...नही...हर आहट मे मुझको ढूंढती होगी... सहमिसी थोड़ी, उम्मीदे लगाए... उन पलों को जरूर चुनती होगी... मेरी माँ आज मेरी राह देखती होगी... मेरी माँ आज मेरी राह देखती होगी..."

रावण

Image
                                     रावण खुद ही ला खड़ा करते हो.. खुद ही मारते हो... कभी अंदर झांक के देखा कितने रावण पालते हो...? धर्म की जीत कहते हो इसे... और अधर्म की हार... धर्म क्या सिर्फ राम ने जाना था...? सीता के पल्लू को भी ना छू के क्या मैने अधर्म किया था? सदियो की एक तपस्चर्या थी... वरदान था शिव जी का... विश्वविजेता था मै...और ज्ञानी इस तल का... पर अहंकार से लतपत...ईर्ष्या से भरा हुआ... अंजाम पता था, फिर भी जिद पे अड़ा हुआ... और इस क्रोध की अग्नि में, मै रावण जला हुआ... इन सारे पापो का प्रायश्चित मिला था मुझे... मेरे अहम का सर्वनाश करके राम ने मुक्त किया था मुझे... मैं अधर्मी नही था...नाही मै कोई व्यभिचारी था...मैं था दशानन... जो दस मुखों से भी सत्य को नही देख पाया था... और आज भी यही हो रहा है... हर एक में कोई रावण छुपा हुआ है... बोलो कब उसे मारोगे... किस दशहरे मे उसको जलावोगे... आज सिर्फ मैं ही खड़ा हूँ, और मरने का डर आज भी मुझे नही है... मन मे व्यथा सि...

कोन है तू...

Image
कोन है तू... जो समझ नही आ रही है मुझे... मैं हिन्दू कहू खुदको तो तू कुरान है शायद... किसी दूसरी भाषा मे लिखी हुवी किताब है शायद... कोन है तू... एक सीधी साधी लड़की कहू तो तू किसी हूर जैसी दिखती है... और अगर परी कहू तुझे तो तू इस जमी की ही लगती है... कोन है तू... धूप मैं कोई छाव जैसी.. शांत, अंधेरी रात जैसी.. जलती हुवी किसी लो जैसी.. या झरोखे से झांकती हुवी किरण जैसी.. कोन है तू... काटो में लिपटा गुलाब हो... या सुर्ख सर्दीवाली रात हो... चमचमाता कोई सितारा... या नीले समंदर का आखरी किनारा... कोन है तू... जो समझ नही आ रही... को है तू...

झंडा...

Image
"सिग्नल पे झंडा बेचनेवाले उस लड़के की आंखों से आंखे नही मिला पाया... उन कागज के तीन रंगों मे हमारे अमन और एकता का रंग नजर ही नही आया... इसीलिए शायद, मैं आज झंडा नही खरीद पाया... एक दिन की देशभक्ति के बाद यही कही मिल जाएगा सड़क पे पड़ा हुआ... आज कल हर रोज देखता हूं उसे किसी शहिद के बदन पे लिपटा हुवा... इसीलिए शायद, आज मैं झंडा नही खरीद पाया... इसका मुझे कोई गम नही... की उसे मैं खरीद नही पाया... क्योंकि वो मुझे मिल जाएगा... मेरी बचपन की यादों में.. देश पर मर मिटने वाले वीरो की शहादत में.. खिलते हुवे इन खेत और खलयानो में.. हसते हुवे उन देश के भविष्य की आंखों में.. वो मुझे मिल ही जायेगा... इसीलिए शायद, आज मै झंडा नही खरीद पाया..."                                    

प्रिय मुलीस...

Image
 प्रिय मुलीस,                   आज खूप दिवसांनी कोणालातरी पत्र लिहतोय, मला माहितेय या digitalization च्या जमान्यात सुध्दा मी हे पत्रासारखं कालबाहय माध्यम वापरतोय याचं तुला आश्चर्य वाटेल.. पण कसं असतं ना की कितीही प्रगत भाषेत तुम्ही बोलत असला, तरी ठेच लागल्यावर मातृभाषेतच वेदना व्यक्त होते. असचं काहीसं समज..असो..! उद्देश एकच, मानातल बोलता यावं...               तुला आठवतं लहानपणी तू रात्रीच्या जेवणासाठी माझी वाट बघत बसायचीस आणि मी आल्यावर आपण दोघे एकाच ताटात एकमेकांना घास भरवत जेवायचो. मला माहिती नाही आता मेस मध्ये जेवताना याची तुला आठवण होते की नाही..पण मी मात्र रोज जेवताना त्या चिमुकल्या घासांना आठवत असतो..आणि नकळत फोन कड़े हात जातो.. आणि पहिला प्रश्न "जेवलीस का बाळा?" या प्रश्नाच उत्तर "हो" किंवा "नाही" हेच असतं मलाही माहितेय..पण अर्थ मात्र त्याचा तेवढाच नसतो, जेवताना एकदा तरी माझी आठवण झाली का?" असं विचारायचं असतं..थोडासा स्वार्थीपणा, बाकी काही नाही... मागे तुमचं ते फेसबुक की काय, त्यावर account...

किरदार...

Image
                                किरदार               कोने में पड़ी हुवी मेरी डायरी में आज भी कई कहानियां कैद है। उन्ही कहानियोमेसे एक किरदार जो मैंने बड़ी सहेजता से और उन्मुक्त होके लिखा था। उसी किरदार को जीने का मन कर रहा है।              वो किरदार जिसे आप हर कहानी मे जिंदा रखना चाहते हो। आप चाहते हो कि वो कभी ना हारे, ना कभी अपने ध्येय से विलग हो। आप चाहते है उससे वही दृढ संकल्प जो अभिमन्यु के मृत्यु पश्चात अर्जुन ने किया था। वही जो हमेशासे ही प्रेरणादायी हो। हा वही किरदार आज मैं जीना चाहता हु। क्योंकि कुछ टूट गया है अंदर और बिखरने लगा है यह वहां..और कमजोर कर रहा है मुझे...संजोने की कोशिश मैं लगा रहता हूं हर बार पर नही हो रहा।शायद वही मुझे इस वेदना से बाहर निकलेगा।               ज्ञात है मुझे कठिन है उसे निभाना पर उसे उतारना होगा अपने भीतर जैसे कोई पौधा उतारता है अपने भीतर वर्षा की हर बूंद को। यह...
Image
                              सुखाएवढं... "जीवनाला चाळणीत घेवून फक्त सुख का बाजूला काढतेयस...? दुःखाला पण सोबत घे... कारण खरं जीवन जगायला तेच शिकवत असतं... दुःख जवळ असल ना कि, माणसातला खरा माणुस ओळखता येतो.. नायतर मुखवटा लावून चांगली वागणारी ही माणसाची जात; उत्तम अभिनय करण्यात निष्णात आहे... दुखाबरोबर वावरत असताना आपण थोडेसे डोकावतो स्वतःतही... शोधू लागतो चुकलेल्या वाटा, आणि लपलेला आत्मविश्वासहि... कधी कधी होते यात अश्रुना वाट मोकळी.. होवू दे ना...चांगलं असतं... किती कुरूप दिसतो आपण यात; हे आपलं आपल्याला कळतं... म्हणून म्हणतो घे सोबत त्याला... किम्मत खऱ्या सुखाची कळण्यासाठी जरूरी आहे ते...सुखाएवढचं..."                                                         -अभि

नायिका

Image
                               नायिका             "तुम्हारी अनुपस्थिति मेरे जीवन का सबसे बड़ा अभाव रहेगी। जब झाँक के देखता हूँ अतीत के पन्नो को तो तुम्हारा अस्तित्व साफ़ नज़र आता है, तुम्हारा मुझमें मुझसे ज़्यादा होना महसूस होता है और ख़ुद अस्तित्वहीन होने का आभास होता है।         ऐसा लगने लगता है कि तुम हमेशा से इस कहानी की नायिका रही हो। अद्वितीय, निडर, निश्छल, छंद या किसी लय सी लड़की, जो अपने किरदार को बख़ूबी निभा रही हो और संघर्ष कर रही हो अपने प्रेम को पाने के लिए।            कहते है की स्त्री हमेशा से अलग अलग तरीको से प्रेम को व्यक्त करती है और पुरुष उसी प्रेम को सिद्ध करता है। पर यहाँ व्यक्त और सिद्ध तुमने ही किया। तुमने ही कहानी को नया आयाम दिया। उसमें नए रंग भरे। सिर्फ़ तुम ही चाहती थी की यहाँ प्रेम विजय हो। और मैं अव्यक्त सा अपने ही आप मैं खोया रहा। तुम्हारे प्रेम को देख कर भी अनदेखा करता रहा। और सोचता रहा की यहा...

पत्र...

Image
" पत्र. ..."   पेनाने नाही तर आसवांनी लिहलेलं... एक पत्र आहे तुझं, मी जपूण ठेवलेलं...             धूळ होती थोडी,             आणि मळकटलेला कागद...             हाताने पूसून त्याला             उचललं मी अलगद... वाचलंय मी ते कितीदातरी, पण पुन्हा वाचावसं वाटलं... आठवणींच्या त्या गावात  पुन्हा धुकं दाटलं...              त्यात शब्द होते मोजकेच;पण              भावना मात्र ठासून भरलेल्या...              एवढ्याशा त्या तुकड्यात,              साऱ्या आठवणी दडलेल्या... प्रत्येक वेळी वाटतं, फाडून टाकावं याला... जळजळत्या त्या अग्निकुंडात, जाळून टाकावं याला...                बुध्दी "हो" म्हणते याला,                पण मन मात्र "नाही" म्हणते...     ...

निर्णय

                                                                                                 निर्णय                           आज तिच्या आधी घरी पोहचायचं होतं...आणि पोहचलोही. ती यायच्या आत घर आवरायचं होतं, याआधी कधी मी हे काम केलंच नाही. मुळात तिने कधी करू दिलच नाही...सुरूवातीला सोप्प वाटणारं काम जेव्हा करायला घेतल्यानंतर अशक्यप्राय वाटू लागतं, तेव्हा स्वत:च्या क्षमतेवर अविश्वास ठेवण्याशिवाय पर्याय उरत नाही. तरीही पाठ थोपाटण्या सारखं नसलं तरी क्षमतेपेक्षा चांगलं काम करण्याचा आनंद झाला..एवढचं! काम आटपून टिव्ही पाहायला बसणार, तेवढयात सौभाग्यवतींची एन्ट्री झाली..रोज कुलूप उघडायची सवय असणाऱ्या आमच्या तिला आज बेल वाजवताना चुकल्यासारखं नक्कीच वाटलं असणार..याचा अंदाज बांधूनच दरवाज...

बालपण...

"बालपण"                           काल मी माझ्या लहानपणीचे फोटो न्याहळत होतो. खूप वेळ एकच फोटो पाहत होतो...बटन तुटलेला शर्ट, अस्ताव्यस्त केस, अनवानी पाय तरीही ऐटीत उभा राहीलेला एक गोंडस मुलगा...खूप हेवा वाटला मला माझ्याच बालपणाचा.                          असं का वाटलं असावं मला? आणि पुन्हा पुन्हा तेच फोटो पाहणं...! यावर थोडा विचार केला. आणि मग लक्षात आलं कि, मी त्या फोटोत काय शोधत होतो..?आणि का मला ती गोष्ट हवीहवीशी वाटतेय..? मी त्या फोटोत माझं निश्चिंत आणि निरागस बालपण शोधत होतो. कसलीही काळजी न करता बागडणारा 'मी' शोधत होतो. हसू आल्यावर हसणारा आणि रडू आल्यावर जोराने रडणारा एक मुलगा शोधत होतो. दिवसभर बेधुंद फिरणारा आणि रात्री आईच्या कुशीत झोपणारा एक हळवा बालक शोधत होतो.                       आणि तो मला कुठेतरी आठवणींच्या ठेवीत सापडलाही...आणि त्यासोबत सापडलं.."माझं बालपण..." पण खंत एवढीच की ते मला ...

जिवन

                                                                      जिवन            जिवन या शब्दाचे अनेक अर्थ आपल्यापरीने लोकांनी लावण्याचा प्रयत्न केला.. मी हि केला. पण मला कळलेलं जिवन हे बालिशपणाचा विचार किंवा सर्वात मोठा अन्वयार्थ देऊन जाणारा कवडसा असू शकतो.           माझ्यामते जिवनाचं वास्तव हे आपल्या कल्पनेप्रमाणे कधीच नसतं. कारण वास्तव आणि कल्पना किंवा आपले विचार हे वास्तव होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याबद्दल बाळगलेल्या अपेक्षा ह्या जशाच तश्या कधीच पूर्णत्वास जात नाहीत. आणि हे सत्य जर असेल तर हा विचार किंवा मला कळालेलं जिवन हे नक्कीच बालिशपणा नसेल.            मला ह्या पेचात पडायचं देखील नाही पण हे वास्तव आहे हे कळाल्यानंतर विचारचक्र दुप्पट वेगाने घुमू लागले. पण मग प्रश्न हा उपस्थित होतो कि कल्पना ह्या आकारणीय अ...